राम अनाथांचा नाथ | आम्हां कैवारी समर्थ || ध्रु ||
वनी सिळा मुक्त केली | गणिका विमानी वाहिली ||१||
राम दीनांचा दयाळ | देवे सोडविले सकळ ||२||
रामी रामदास म्हणे | आता आम्हां काय उणें ||३||


नेणोभक्ती नेणो भाव | आम्ही नेणो दुजा देव ||१||
राघवाचे शरणांगत | जालों राम नामांकित ||२||
मुखी राम नामावळी | काळ घालू पायांतळी ||३||
रामदासी रामनाम | बांधू नेणे काळ काम || ४ ||